Sunday, August 17, 2025 04:54:51 AM

मालामाल झाले गुंतवणूकदार! मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा 20 रुपयांचा शेअर बनला रॉकेट

मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपच्या एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलचं मालामाल केलं आहे. या कंपनीचे शेअर्स 23.20 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.

मालामाल झाले गुंतवणूकदार मुकेश अंबानींच्या या कंपनीचा 20 रुपयांचा शेअर बनला रॉकेट
Mukesh Ambani
Edited Image

Penny Stock: शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे, ज्यात कधी कोणता स्टॉक रॉकेट बनेल ते सांगता येत नाही. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपच्या एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलचं मालामाल केलं आहे. रिलायन्स ग्रुपच्या टेक्सटाइल स्टॉक आलोक इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज, आलोक इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ट्रेडिंगमध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरची किंमत 25 रुपयांपेक्षा कमी आहे.

आलोक इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 15 टक्क्याहून अधिक वाढ - 

मंगळवारी, आलोक इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 15.30 टक्क्यांनी मोठी वाढ झाली. या कंपनीचे शेअर्स 23.20 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशवर नवीन कर लादल्यानंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. अमेरिकेने बांगलादेशवर 36 टक्के नवीन कर लादला आहे, जो 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल. अमेरिकेच्या या पावलाकडे भारताच्या कापड क्षेत्रासाठी एक संधी म्हणून पाहिले जात आहे. बांगलादेशवरील कर भारताच्या कापड निर्यातीला चालना देऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा - EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 33.56 कोटी खात्यात जमा करण्यात आले 8.25 टक्के व्याज

बांगलादेशची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कापड उत्पादनावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, ट्रम्पच्या या घोषणेमुळे त्यांच्यातील तणाव वाढला आहे. यापूर्वी, एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी 36 टक्के कमी कर जाहीर केला होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 36 टक्के करामुळे अमेरिकन खरेदीदार भारताकडे वळू शकतात.

हेही वाचा - अमेझॉनवर वस्तू खरेदी करणे झाले महाग! कंपनी आता आकारणार मार्केटप्लेस फी

भारत-अमेरिका व्यापार करार - 

दरम्यान, भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही देशांमधील करार लवकरचं जाहीर होऊ शकतो. अमेरिका-भारत व्यापार कराराचा फायदा कापडांसह काही संवेदनशील क्षेत्रांना होण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला, भारताने ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केला होता.

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री