Tuesday, December 10, 2024 11:06:26 AM

Laxman Hake
'पवारांच्या सांगण्यावरून जरांगेंची माघार'

शरद पवारांच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.

पवारांच्या सांगण्यावरून जरांगेंची माघार

पुणे : शरद पवारांच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. पत्रकार परिषद घेऊन जरांगेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हाकेंनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. 

महाराष्ट्रासारख्या राज्यात विशिष्ट जातीआधारे विधानसभेची निवडणूक जिंकणे कठीण आहे. पण जरांगेंना हे पण समजत नाही. त्यांना तेवढी राजकीय समज नाही; असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी लढत असलेल्या उमेदवारांना ओबीसींचा पाठिंबा आहे. या उमेदवारांसाठी सभा घेत आहे आणि घेत राहणार; असे एका प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मण हाकेंनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo