मुंबई : दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या नाताळच्या सुट्टीचे बेत नागरिकांनी आत्तापासूनच आखले आहेत. राज्यात धावणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेसचे तिकिट वेटिंगवर पोहोचले आहे. खासकरुन डिसेंबर महिन्यात कोकण आणि गोवा मार्गावरील गाड्यांचे तिकिट फुल्ल झाले आहे. रेल्वेचे तिकिट १२० दिवस म्हणजेच चार महिने आधी आरक्षित करण्याची सोय आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात येणाऱ्या सुट्यांचा अंदाज घेउन नागरिक, पर्यटक फिरायला जाण्याचे, मूळ गावी जाण्याचे बेत आखतात. सध्याच्या घडीला मुंबईतून राज्याच्या विविध जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख मेल-एक्सप्रेसचे तिकिट वेटिंगवर गेले आहे.