Sunday, August 17, 2025 01:39:07 AM

Pink Moon And Meteor Shower : खगोलप्रेमींना पर्वणी! 12 एप्रिलला गुलाबी चंद्र तर, 'या' तारखेला दिसणार उल्का वर्षाव

गुलाबी चंद्राची कल्पना फक्त प्रेम-कविता करणाऱ्या कवींच्या डोक्यात आली असेल. मात्र, गुलाबी चंद्र ही फक्त एक कल्पना नसून ती एक अत्यंत महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे.

pink moon and meteor shower  खगोलप्रेमींना पर्वणी 12 एप्रिलला गुलाबी चंद्र तर या तारखेला दिसणार उल्का वर्षाव

Pink Moon And Meteor Shower : एप्रिल महिन्यात अनेक अवकाशीय घटना घडणार आहेत, ज्या खगोलप्रेमींसाठी एकदम खास ठरणार आहेत. रात्रीच्या आकाशात यापैकी अनेक अवकाशीय हालचाली दिसतील. त्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरू शकतात. यामध्ये गुलाबी चंद्र (Pink Moon) आणि उल्कावर्षाव (Meteor Shower) पाहायला मिळू शकतो. 

गुलाबी चंद्र
गुलाबी चंद्राची कल्पना फक्त प्रेमाच्या कविता करणाऱ्या कवींच्या डोक्यात आली असेल. मात्र, गुलाबी चंद्र ही फक्त एक कल्पना नसून ती एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना आहे. 'गुलाबी चंद्र' (Pink Moon) हे सुंदर दृश्य 12 एप्रिल 2025 ला दिसणार आहे. जरी त्याचा रंग प्रत्यक्षात गुलाबी नसला तरी, वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या एका खास गुलाबी रंगाच्या फुलावरून त्याला हे नाव मिळालं आहे.

उल्का वर्षाव
याशिवाय, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात लायरिड उल्का वर्षाव (Lyrid meteor shower) देखील होणार आहे. ही एक अद्भुत खगोलीय घटना आहे, जेव्हा आकाशात तुटणारे तारे किंवा उल्का दिसतात. जर तुम्हालाही शांत रात्रीच्या आकाशात काहीतरी खास आणि वेगळं बघायचं असेल, तर एप्रिलमधील ही रात्र चुकवू नका.

हेही वाचा - ChatGPT आता बनावट आधार आणि पॅन कार्डही बनवत आहे? जाणून घ्या, यामुळे किती नुकसान होऊ शकते?

'गुलाबी चंद्र' कधी दिसेल?
एप्रिलमधील पौर्णिमा, म्हणजेच 'गुलाबी चंद्र', 12 एप्रिल 2025 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 5:52 वाजता (IST) पूर्ण तेजामध्ये आकाशात दिसेल. तुम्हाला ते बघायचं असेल, तर सूर्यास्तानंतर लगेच पूर्वेकडे पाहा. मात्र, हे लक्षात घ्या की, या चंद्राचं नाव गुलाबी चंद्र असं ठेवण्यात आलंय.. याचा रंग गुलाबी नसतो.

हा गुलाबी चंद्र गुलाबी का दिसत नाही?
हा चंद्र ज्या काळात आकाशात दिसतो, तो वसंत ऋतूचा काळ असतो. या काळात अमेरिकेत फुलणाऱ्या 'क्रिपिंग फ्लॉक्स' (Creeping Phlox) नावाच्या गुलाबी फुलावरून त्याला हे नाव मिळालं आहे. ही फुलं नवीन सुरुवात आणि वसंत ऋतूतील नवनिर्माण आणि ताजेपणाचे ताजगीचं प्रतीक मानली जातात. या काळात अमेरिकत असलेल्या गुलाबी वातावरणावरून या चंद्राला हे नाव मिळालं आहे.

मायक्रो मून म्हणजे काय?
या वेळी पौर्णिमा 'मायक्रो मून' असेल, म्हणजेच चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वात दूरच्या बिंदूवर (अपोजी) असेल. यामुळे तो नेहमीपेक्षा सुमारे 14% लहान आणि 30% कमी तेजस्वी दिसेल. हे सुपरमूनच्या अगदी उलट आहे.

लायरिड उल्का वर्षाव
इसवीसनपूर्व 687 पासून नोंदवला गेलेला लायरिड उल्का वर्षाव एप्रिलच्या मध्यापासून शेवटपर्यंत दिसेल. 21-22 एप्रिलच्या रात्री तो सर्वांत जास्त प्रमाणात असेल. त्या रात्री चंद्र उशिरा उगवणार असल्यामुळे आकाश अधिक गडद राहील आणि उल्का स्पष्टपणे दिसतील. या उल्का वर्षावात वेगवान आणि तेजस्वी रेषा दिसू शकतात आणि कधीकधी 'अग्नीचे गोळे' (fireballs) देखील दिसू शकतात.

याच वेळी आणखी एक उल्का वर्षाव दिसणार
लायरिड उल्का वर्षावाबरोबरच याच वेळी आणखी एक उल्का वर्षाव सुरू होईल, तो म्हणजे, इटा ॲक्वारिड्स (Eta Aquarids). तो 20 एप्रिलपासून सुरू होऊन 21 मे पर्यंत चालेल. 3-4 मे रोजी यापैकी सर्वाधिक उल्कांचा वर्षाव होईल. खगोलप्रेमींसाठी या घटनांचं महत्त्व खूप मोठं आहे. एप्रिल आणि मे महिना त्यांच्यासाठी खास असेल.

हेही वाचा - Unlimited 5G Data : 'अनलिमिटेड' 5G डेटाची ऑफर आहे साफ खोटी? Jio, Airtel, VI यांच्या अमर्याद इंटरनेटचा अर्थ काय?

ईस्टर आणि गुलाबी चंद्राचा संबंध
पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी ईस्टर साजरा केला जातो. 2025 मध्ये वसंत विषुववृत्त 20 मार्चला होतं आणि पहिली पौर्णिमा 12 एप्रिलला आहे. त्यामुळे ईस्टर रविवार 20 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. जर तुम्हाला चंद्र बघायला आवडत असेल, तर पुढील पौर्णिमा 'फ्लॉवर मून' (Flower Moon) 12 मे 2025 रोजी दुपारी 12:26 वाजता (IST) दिसेल.
 


सम्बन्धित सामग्री