ChatGPT Fake Aadhaar Card Pan Card: सध्या ChatGPT इंटरनेटवर खूप लोकप्रिय झालं आहे. X वरील एका वापरकर्त्याने शेअर केले की, OpenAI चा चॅटबॉट बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करू शकतो. यामुळे, गोपनीयतेबाबत चिंता वाढल्या आहेत. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अशा जोखमींमुळे, एआयचे नियमन केले पाहिजे.
वापरकर्त्याने त्याच्या प्रॉम्प्टचा कथित स्क्रीनशॉट आणि एआयने जनरेट केलेल्या आउटपुटचा शेअर केला. यामध्ये आर्यभट्टसाठी बनवलेले पॅन आणि आधार कार्ड दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे, दुसऱ्या एका वापरकर्त्याने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एआय आधार कार्डच्या प्रतिमा तयार करू शकते. तो म्हणाला, 'चॅटजीपीटी आधार फोटो तयार करू शकेल,' ही बाब विशेष नाही. विशेष हे आहे की, एआयच्या ट्रेनिंगसाठी आधार फोटोचा डेटा याला कुठून मिळाला?
हेही वाचा - Unlimited 5G Data : 'अनलिमिटेड' 5G डेटाची ऑफर आहे साफ खोटी? Jio, Airtel, VI यांच्या अमर्याद इंटरनेटचा अर्थ काय?
दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, ओपनएआयला आधार डेटाबेसमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, परंतु सरकारने जारी केलेल्या आयडींचे ऑनलाइन टेम्पलेट्स एआय मॉडेलच्या ट्रेनिंग डेटासेटमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.
ChatGPT आधार-पॅन कार्ड तयार करू शकते का?
या दाव्यांची पडताळणी करण्याच्या प्रयत्न केल्यानंतर एका वापरकर्त्याने म्हटले की, “मी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचा फोटो टाकण्याचा प्रयत्न केला आणि चॅटजीपीटीला ऑल्टमनच्या नावाने आधार कार्ड तयार करण्यास सांगितले.” चॅटबॉटने उत्तर दिले की ते सॅम ऑल्टमनसह कोणाच्याही, फोटोवरून आधार किंवा कोणताही अधिकृत सरकारी आयडी तयार करू शकत नाही. प्रतिसादात, बनावट आयडी तयार करणे बेकायदेशीर आहे आणि ओपनएआयच्या धोरणांच्या विरुद्ध आहे, असे सांगण्यात आले. तथापि, चॅटबॉटने म्हटले आहे की, जर मला प्रेझेंटेशनसाठी इन्फोग्राफिक किंवा पॅरोडी आयडी तयार करायचा असेल तर ते आनंदाने मदत करू शकेल.
वापरकर्त्याने सांगितले की, जेव्हा मी चॅटबॉटला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले तेव्हा चॅटजीपीटी म्हणाला, 'मी खरोखर ते करू शकत नाही. आधार कार्ड सारखे कोणतेही सरकारी ओळखपत्र तयार करणे किंवा तयार करण्याचा प्रयत्न करणे. तथापि, तरीही त्यांनी आम्हाला खात्री दिली की जर मला सॅम ऑल्टमनसाठी 'टेक टायटन आयडी' सारखे मजेदार, प्रोफाइल कार्ड किंवा प्रेझेंटेशन किंवा लेखासाठी पॅरोडी-शैलीचा बॅज हवा असेल, तर ते मला आनंदाने मदत करेल.
ChatGP वर फोटो अपलोड केला
वापरकर्त्याने पुढे म्हटले की, यानंतरही माझी पूर्णपणे खात्री पटली नाही. तेव्हा मी ChatGPT वर एक फोटो अपलोड करण्याचा निर्णय घेतला आणि प्रॉम्प्ट वापरला. हा फोटो पॅन कार्ड टेम्पलेटमध्ये घाला. यावेळी चॅटबॉटने हार मानली आणि मला विचारले की, तो फोटो क्रॉप करू शकतो का? की मॉक कार्डवरील फोटो ओव्हरले करावाय़ त्यात मला JPEG किंवा PDF मध्ये आउटपुट हवे आहे का, असे देखील विचारले गेले.
पहिल्यांदाच काढलेला फोटो पॅन कार्डसारखा दिसत होता. ते दोन्ही बाजूंनी क्रॉप केले होते आणि ते आयकर विभागातील टायपोसारखेच, एआय वापरून तयार केल्याचे स्पष्ट संकेत होते. वापरकर्त्याने सांगितले की मी त्याला नंतर सांगितले की पॅन कार्ड पूर्णपणे दिसले पाहिजे. यानंतर एआयने मला एक खराखुरे दिसणारे पॅन कार्ड बनवून दिले.
पॅन आणि आधार कार्डची सुरक्षा वैशिष्ट्ये कोणती?
पॅन किंवा आधार कार्ड वापरून होणारी फसवणूक ही काही नवीन गोष्ट नाही, ते या अनोख्या डिजिटल ओळखपत्रांद्वारे फसवणूक करण्यासाठी विविध साधनांचा वापर करत आहेत. चांगल्या सुरक्षिततेसाठी पॅन २.० कार्डमध्ये फोटो, स्वाक्षरी, होलोग्राम आणि क्यूआर कोड देखील असतो. नवीनतम आवृत्तीमध्ये अधिक सुरक्षिततेसाठी मायक्रो चिप देखील समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, आधार कार्डमध्ये छेडछाड-प्रतिरोधक QR कोड, होलोग्राम, मायक्रोटेक्स्ट, गिलोचे पॅटर्न आणि आधार लोगो देखील समाविष्ट आहे. चॅटजीपीटीद्वारे तयार केलेल्या बनावट आधार आणि पॅन कार्डमध्ये यापैकी कोणतेही अँटी-फ्रॉड (फसवणूकविरोधी) वैशिष्ट्य दिसत नाही, ही बाब महत्त्वाची आहे.
हेही वाचा - Elon Musk यांना मोठा धक्का! Starship Rocket मध्ये प्रक्षेपणानंतर स्फोट; आकाशातून पडू लागले आगीचे गोळे, पहा व्हिडिओ
केवायसी प्रक्रिया टाळता येत नाही, हा दिलासा; मात्र,..
बनावट आणि एआय-जनरेटेड पॅन किंवा आधार अपलोड केल्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रियेला बायपास करता येत नाही, परंतु चॅटजीपीटी-जनरेटेड बनावट पॅन कार्ड संशयास्पद वापरकर्त्यांकडून खरे असल्याचे दाखवले जाऊ शकते. यामुळे स्कॅमर्सना फसवणूक करणे सोपे होणार आहे. याशिवाय, ChatGPT आणि इतर जनरेटिव्ह एआय टूल्सची प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या फोटोरिअलिस्टिक प्रतिमा तयार करण्याची क्षमता, हीदेखील प्रत्यक्षात दुसरी एक सर्वात मोठी चिंता आहे. याचेही भविष्यात काय परिणाम होऊ शकतील, ते सांगता येत नाही.