Thursday, September 12, 2024 12:30:48 PM

Rohit Pawar
'...तो निर्णय अजित पवारांचा नसेल'

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात काकू सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काका अजित पवार यांनी घेतला नसेल; असा दावा राशप आमदार रोहित पवार यांनी केला.

तो निर्णय अजित पवारांचा नसेल

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात काकू सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काका अजित पवार यांनी घेतला नसेल; असा दावा राशप आमदार रोहित पवार यांनी केला. अजित पवारांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी हा दावा केला. याआधी अजित पवारांनी बारामतीत सुप्रिया विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन चूक केल्याचे वक्तव्य केले. अजित पवारांच्या या वक्तव्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी बारामतीतल्या उमेदवारीबाबतचा निर्णय अजित पवार यांनी घेतला नसेल; असा दावा केला. 


सम्बन्धित सामग्री