छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात गुरुवारी कमाल तापमान ४३.५ आणि रात्रीचे तापमान २९.४ अंश सेल्सिअस उच्चांकी पातळीवर गेल्याची प्रथमच नोंद झाली. सर्वात उष्ण दिवस व रात्र ठरली. गेल्या ६ दिवसांत तापमानात ५.५ अंशांनी विक्रमी वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी तापमान जास्त राहिले. तीव्र उष्णतेमुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पसरला.तर पुढील दोन दिवस सूर्य कोपलेलाच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे उन्हाची काहिली झाल्याचे चित्र आहे. उन्हामुळे लोकांची हाल होत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मान्सून कधी बरसतोय याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.