मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांकडून ऑपरेशन घड्याळ सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाचे काही खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरेंकडे ऑपरेशन घड्याळची जबाबदारी देण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे अनेक खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्यामुळे सुप्रिया सुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राजकीय वर्तुळात ऑपरेशन घड्याळबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'दिल्लीत मंत्रीपदासाठी पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात शरदचंद्र पवार यांचे खासदार असल्याच्या चर्चा आहेत. दिल्लीतील मंत्रीपदासाठी पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाकडून होत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रिपद हवंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊतांनी निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडले आहे.
हेही वाचा : 'विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे दहा उमेदवार पडले' कोणी केला आरोप ?
सुनील तटकरे शरद पवार गटाच्या खासदारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर आमदार संग्राम जगताप यांनी भाष्य केले आहे. आम्ही फोन करत नाही त्यांचेच मिस्ड कॉल येतात. आम्ही येणाऱ्यांचे स्वागत करू असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.