Saturday, May 10, 2025 01:22:06 AM

शिवरायांचं नाव घेतलेलं इंदिरा गांधींचं एक तरी भाषण दाखवा - देवेंद्र फडणवीस

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.

शिवरायांचं नाव घेतलेलं इंदिरा गांधींचं एक तरी भाषण दाखवा - देवेंद्र फडणवीस 

शिवरायांचं नाव घेतलेलं इंदिरा गांधींचं एक तरी भाषण दाखवा - देवेंद्र फडणवीस 


मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे पाहायाला मिळत आहे. विरोधी पक्षाकडून राज्यातील महायुती सरकारवर टीका केली जात आहे. यादरम्यान रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घटनेबाबत राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले.

पहिली गोष्ट माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्यप्रदेशमध्ये ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून तोडला, त्याच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मुग गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का हटवला, याबद्दल ते एक शब्दही ते का बोलत नाहीत? याचं उत्तर दिलं पाहिजे असे फडणवीस यावेळी म्हणाले.

काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती, पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची लूट करायला गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला काँग्रेसने इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात, की केवळ खुर्ची करता त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात का? हे तुम्ही सांगितलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले


सम्बन्धित सामग्री