Saturday, August 16, 2025 05:55:42 PM

सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार

रुग्णालयांत आग लागण्याच्या घटना नवीन नाहीत.

 
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार

मुंबई : रुग्णालयांत आग लागण्याच्या घटना नवीन नाहीत. त्यामुळे कायमच फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना अग्निशमन दलाकडून रुग्णालय प्रशासनाला दिल्या जातात. आगीच्या घटना रोखण्यासाठी शासनामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. या घटनांचा प्रतिबंध करण्यासाठी इंटरनेटवर आधारित अद्ययावत सॉफ्टवेअर बाजारात आले असून, ते बसविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. विभागाच्या ११ रुग्णालयांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामध्ये जे.जे. रुग्णालयाचा समावेश आहे.  

     

सम्बन्धित सामग्री