Saturday, May 10, 2025 11:05:31 PM

घरात भिंतीवर बंद घड्याळ आहे? दुरुस्त करा किंवा ते काढून नवीन आणा; अन्यथा, होऊ शकतं मोठं नुकसान

वास्तुशास्त्रानुसार, घरातील घड्याळ ही केवळ एक वस्तू नव्हे,  तर तुमची चांगली किंवा वाईट वेळही थांबवण्याची/ बदलण्याची त्यात क्षमता असते, असे मानले जाते. त्यामुळेच घरात बंद पडलेलं घड्याळ अशुभ मानलं जातं.

घरात भिंतीवर बंद घड्याळ आहे दुरुस्त करा किंवा ते काढून नवीन आणा अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Vastushastra About Clock That Has Stopped : वास्तुशास्त्रानुसार, बंद घड्याळ घरात असू नये. कारण, ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हे करिअरमध्ये अडथळे निर्माण करू शकते, आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या वाढवू शकते. घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक तर बंद पडलेलं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा ते काढून टाकून सरळ नवीन घड्याळ आणावं.

तुमच्या घरात भिंतीवर बंद पडलेलं घड्याळ असल्यास, ते मोठ्या त्रासाचं लक्षण असू शकतं! वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बंद पडलेलं घड्याळ घरात नकारात्मक ऊर्जा आणतं आणि प्रगतीत अडथळे निर्माण करू शकतं. वास्तुशास्त्रानुसार, घरातील घड्याळ ही केवळ एक वस्तू नव्हे,  तर तुमची चांगली वेळही थांबवण्याची त्यात ताकद असते, असे मानले जाते. त्यामुळेच घरात बंद पडलेलं घड्याळ अशुभ मानलं जातं. त्याचे काय तोटे होऊ शकतात, ते जाणून घेऊ...

हेही वाचा - तुम्हाला माहीत आहे, 'या' 5 लोकांच्या मृतदेहांचं काशीत दहन होत नाही? 'हे' आहे कारण

घरात बंद पडलेलं घड्याळ अशुभ का असतं?
काळ थांबत नाही. तो सतत पुढे जात राहतो, हे जीवनाचं सत्य आहे. पण जेव्हा भिंतीवरचं घड्याळ थांबतं, तेव्हा त्याचे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुमची प्रगतीही थांबवू शकते. असं मानलं जातं की, जेव्हा वेळ थांबते, तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे जीवनात अडथळे येऊ लागतात.

हे असू शकतात बंद पडलेल्या घड्याळाचे धोकादायक आणि नकारात्मक परिणाम
चांगल्या संधी हातातून निघून जाणे : तुमच्या आयुष्यात चांगल्या संधी येत नसतील किंवा वारंवार संधी हातातून निसटत असतील आणि त्याचं कारण तुम्हाला समजत नसेल, तर ते कारण तुमच्या घरातील बंद पडलेलं घड्याळ असू शकतं.
करिअर आणि प्रगतीत अडथळा : घरात किंवा ऑफिसमध्ये बंद पडलेलं घड्याळ असल्यास, ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतं. अनेकदा लोकं खूप मेहनत करतात, पण त्यांना फळ मिळत नाही.
आर्थिक समस्या वाढतात : वास्तुशास्त्रानुसार, बंद पडलेल्या घड्याळामुळे चांगल्या संधी निघून जाणे, प्रगतीत अडथळा येणे अशा गोष्टी होत असल्याने आपोआपच यामुळे घरात आर्थिक समस्या वाढू शकतात.
घरातील लोकांना आजारपण येऊ शकतं : असं मानलं जातं की, बंद पडलेलं घड्याळ घरात आरोग्याच्या समस्या आणू शकतं. घरातील कोणी आजारी असल्यास, त्यांच्या समस्या वाढू शकतात.
नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव : बंद पडलेलं घड्याळ घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं, ज्यामुळे घराचं वातावरण जड आणि उदास बनू शकतं.

घरात बंद पडलेलं घड्याळ असल्यास काय करावं?
- घड्याळ दुरुस्त करा किंवा ताबडतोब काढून टाका.
- घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं शुभ असतं.
- घड्याळाची वेळ नेहमी योग्य ठेवा.
- तुटलेली किंवा खराब झालेली घड्याळं घरात अजिबात ठेवू नका.
- तुमच्याकडे डिजिटल घड्याळ असल्यास, ते चालू ठेवा.

हेही वाचा - लेकीचा जन्म पित्यासाठी भाग्याचा; 'या' आई-बापांसाठी हा जन्म ठरतो शेवटचा आणि नंतर मिळतो मोक्ष!

बंद घड्याळाशी संबंधित खास उपाय
जेव्हा तुम्ही बंद घड्याळ घरातून काढून टाकायचा निर्णय घेता, तेव्हा ते थेट कचऱ्यात फेकू नका. त्याआधी एक छोटी गोष्ट करा. तुमच्या समस्येचं प्रतीक त्या घड्याळाला जोडा. उदाहरणार्थ, जर तुमच्या नात्यात तणाव असेल, तर त्या समस्येशी संबंधित एक शब्द किंवा चित्र कागदावर काढा आणि ते घड्याळासोबत लपेटून घ्या. आता ते सगळं एका काळ्या कपड्यात बांधून घरापासून दूर एका स्वच्छ कचरापेटीत टाका. यानंतर परत येत असताना मागे वळून पाहू नका. असं मानलं जातं की असं केल्याने तुमची नकारात्मकता तिथेच राहते आणि तुम्ही एका नव्या सुरुवातीसाठी तयार होता.

घरात कोणतं घड्याळ आणावं
जर तुम्ही नवीन घड्याळ लावण्याचा विचार करत असाल, तर हालणारा लोलक किंवा लंबक असलेलं भिंतीवरचं घड्याळ चांगला पर्याय ठरू शकतं. अशी घड्याळं पूर्वी अनेकांच्या घरात पाहायाला मिळत असत. आजही वास्तुशास्त्रानुसार ती शुभ मानली जातात. ते घराच्या पूर्व दिशेला लावणं फायदेशीर मानलं जातं, कारण ही दिशा उगवत्या सूर्याची आहे आणि नवीन ऊर्जेचं प्रतिनिधित्व करते. तेव्हा बंद पडलेल्या घड्याळाला फक्त एक वस्तू समजून हलक्यात घेऊ नका..

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री