Vrindavan Monkey Viral Video: वृंदावनमध्ये एका माकडाने एका माणसाचा सॅमसंग एस25 अल्ट्रा फोन हिसकावून घेतला आणि ते उंचावर बसलं. दीड लाखांचा फोन हिसकावून घेतल्यानंतर तो माणूस अस्वस्थ झाला. पण शेवटी प्रसंगावधान राखून त्यानं अशी युक्ती केली की, त्याचे कौतुकही वाटेल आणि हसूही येईल.
आपण सर्वांनी लहानपणी 'टोपीवाला आणि माकडे' ही गोष्ट ऐकलेली असते. गोष्टीतल्या टोपीवाल्याकडच्या टोप्या झाडावरची माकडं पळवून नेतात. आपल्यापैकीही अनेकांना माकडानं वस्तू पळवल्याचा अनुभव आलेला असेल. मात्र, गोष्टीतली शिकवण कशी वापरायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. मात्र, वृंदावनातल्या माकडाने मोबाईल पळवल्यानंतर त्या व्यक्तीला गोष्टीतली ही युक्ती सुचली आणि त्यानं त्याचा मोबाईल सहीसलामत परत मिळवला.
हेही वाचा - VIDEO: पालकांनो, मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवा; चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकेल!
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
होळीनिमित्त अनेकजण वृंदावनला जातात. कारण, वृंदावनातली होळी पाहण्याची अनेकांची इच्छा असते. अशाच वृंदावनमध्ये आलेल्या एका माणसाचा मोबाईल माकडाने पळवला. मग या व्यक्तीने गोष्टीतल्या टोपीवाल्याप्रमाणे युक्ती केली. त्याने माकडाच्या स्वभावाला आजमावून पाहण्याचे ठरवले.
टोपीवाला आणि माकडांची गोष्ट आठवली
गोष्टीतल्या टोपीवाल्याने सुरुवातीला माकडांना ओरडून घाबरण्याचा प्रयत्न केला. त्यावर माकडांनीही दात विचकून वेगवेगळे आवाज करून प्रतिक्रिया दिली. यानंतर टोपीवाल्याने माकडांना दगड मारले. मग माकडांनीही हातात सापडेल ते त्याला फेकून मारले. हे पाहिल्यानंतर टोपीवाल्याला माकडे त्याची नक्कल करत असल्याचे लक्षात आले. आणि त्याला छानपैकी युक्ती सुचली. माकडांची बुद्धी ओळखून त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढून जमिनीवर रागाने फेकल्यासारखे केले. त्यानंतर माकडांनी स्वतःकडच्या टोप्या काढून जमिनीवर फेकल्या आणि अशा प्रकारे टोपीवाल्याला सर्व टोप्या परत मिळाल्या.
अगदी अशाच पद्धतीने या मोबाईल मालकाने माकडाकडे खाण्याची वस्तू टाकली. ते एक फ्रूटीचे पाकिट होते. ते मिळताच माकडाने आपणहोऊन मोबाईल त्या माणसाकडे टाकला. त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि त्याचा फोन परत मिळवला. त्या माणसाने माकडाकडून फोन परत मिळवण्यासाठी वापरलेल्या युक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सर्वांत वेगवान डील
कार्तिक राठोडने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये माकड बाल्कनीत महागडा फोन हातात घेऊन बसलेले दिसते. खाली असलेले तीन पुरुष तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, "वृंदावनमध्ये हे एक सामान्य दृश्य आहे. येथे हे अनेकदा घडते." असे दिसते की या माकडाला वस्तुविनिमय व्यवस्था (बार्टर सिस्टम) आपल्यापेक्षा चांगली समजते. आणखी एका युजरने म्हटलं की, ही मानवी इतिहासातील सर्वांत वेगवान डील होती.
हेही वाचा - VIDEO : पाण्यात उभं राहून मजेत फोटो काढत होता; तेवढ्यात पायाला काहीतरी लागलं.. बघतो तर काय.. हातात आली मगर..