Woman dies after slab collapses प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
विरार: पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथून धक्कादायक घटना समोर येत आहे. एका अपार्टमेंटमध्ये घराच्या छताचा स्लॅब कोसळून 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एमबी इस्टेट परिसरातील मर्चंट अपार्टमेंटमध्ये घडली. अल्फिया अब्बास मानसवाला असे पीडित महिलेचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फिया तिच्या पती, मुलगा हुसेन मानसवाला, सून आणि नातवंडांसह इमारतीच्या सी-विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 11 मध्ये राहत होती.
घटनेच्या वेळी तिचे कुटुंब बेडरूममध्ये होते, तर अल्फिया आणि तिचा पती हॉलमध्ये झोपले होते. यावेळी अचानक हॉलवरील स्लॅब खाली कोसळला. यात अल्फिया गंभीर जखमी झाली. त्यानंतर अल्फियाला ताबडतोब विरारमधील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - बीडच्या वैजनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवल्याची खळबळजनक घटना उघड; दोन कामगारांवर कारवाई
बोलिंज पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राम कुंडगीर यांनी सांगितले की, आम्ही अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे. सध्या पोलिस स्लॅब कोसळण्याचे कारण आणि निष्काळजीपणा किंवा इमारतीची देखभालीची कमतरता या दुर्घटनेला कारणीभूत आहे का? याचा तपास करत आहेत.
हेही वाचा - क्षणिक मोह जीवावर बेतला: फोटो काढण्याच्या नादात तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू
11 दिवसांत स्लॅब कोसळण्याची तिसरी घटना-
दरम्यान, वसई-विरार प्रदेशात गेल्या 11 दिवसांत स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे परिसरातील जुन्या निवासी इमारतींच्या संरचनात्मक अखंडतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वी, सोमवार, 25 मे रोजी मुंबईजवळील विरार पूर्वेतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये छताचा एक भाग कोसळल्याने एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत महिलेच्या दोन लहान मुलांना दुखापत झाली.