Mobile screen blue light effects : मोबाईलमधून निघणारी ‘ब्लू लाइट’ त्वचेसाठी धोकादायक, यापासून ‘असा’ करा बचाव
Mobile screen blue light effects : सद्या आपण डिजीटल युगात वावरत आहोत. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या स्क्रीनसमोर लहानग्यांपासून वयोवृद्धापर्यत अधिकाधिक वेळ घालवत आहेत. हे डिव्हाइसेस ज्या ब्लू लाईट (Blue Light) चा उत्सर्जन करतात. हे ब्लू लाईट केवळ डोळ्यांसाठी नाही. तर आपल्या त्वचेसाठीही अतिशय हानिकारक ठरू शकते. संशोधनानुसार, ही निळसर किरणं त्वचेच्या आत शिरून अनेक त्वचारोगांना कारणीभूत ठरतात. ब्लू लाईटमुळे होणारे परिणाम आणि यापासून कसा बचाव करता येईल याचा आढावा आपण या लेखातून पाहुयात.
ब्लू लाईटमुळे त्वचेवर काय दुष्परिणाम होतात
- ब्लू लाईटमुळे त्वचेला ताठपणा देणाऱ्या कोलेजनचं विघटन होतं. ज्यामुळं सुरकुत्या आणि लवकर वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात.
- दीर्घकाळ स्क्रीनच्या संपर्कात राहिल्यास त्वचेवर काळे डाग, टॅनिंग आणि अनईव्हन स्किन टोन निर्माण होतो.
- ब्लू लाईटमुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळं त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.
- फ्री रॅडिकल्स वाढून त्वचेचे नुकसान होतं. ज्यामुळं एजिंग प्रोसेस वेगाने होते.
हेही वाचा - Home Decoration Tips : घराचं डेकोरेशन तर करायचंय.. पण जास्त खर्च परवडणार नाही? अशी करा आपल्या बजेटमधली सजावट
या घातक ब्लू लाईटपासून कसा बचाव केला पाहिजे
- व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-E, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आणि नायसिनामाइड असलेले सीरम व मॉइश्चरायझर वापरावेत. ज्यामुळे या लाईटपासून बचाव होईल.
- ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा वापर करा. घरात असतानासुद्धा SPF 30+ आणि PA+ असलेला मिनरल बेस्ड सनस्क्रीन लावावा.
- स्क्रीन टाइम मर्यादित करा. प्रत्येक २० मिनिटांनी स्क्रीनकडून नजर हटवा. नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टरचा वापर यावर फायदेशीर ठरतो.
- हायड्रेशन आणि पौष्टिक आहार घ्या. भरपूर पाणी प्या. बेरीज, ड्रायफ्रूट्स, हिरव्या भाज्या आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
- ब्लू लाईट ब्लॉकर वापरा. मोबाईल आणि लॅपटॉपवर ब्लू लाईट फिल्टर किंवा स्क्रीन प्रोटेक्टर लावल्यास थेट परिणाम कमी होतो.
हेही वाचा - दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट? महिनाभर नाही घेतला तर काय होईल?