मुंबई : शरीरासाठी दुध पिण्याचे अनेक फायदे आहेत. दुध प्यायल्याने हाडेखील मजबूत होतात. मात्र काळ्या मिरीसोबत दुधाचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? दुधात काळी मिरी टाकून पिल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
दुधात काळी मिरी टाकून प्यायल्याने होतात अनेक फायदे खालीलप्रमाणे -
1. प्रतिकारशक्ती वाढवते
काळी मिरीत अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करतात. त्यामुळे दुधासोबत घेतल्याने फायदा होतो.
2. हाडे आणि सांधेदुखीसाठी उपयुक्त
दूध कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, आणि काळी मिरी हाडांना बळकट करण्यास मदत करते. सांधेदुखी, संधिवात आणि अशा समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
3. पचनसंस्था सुधारते
काळी मिरी पचनसंस्थेचे कार्य सुधारते व पचनक्रिया सुलभ करते.पोटातील गॅस, अॅसिडिटी, आणि अपचन यावर गुणकारी आहे.
4. श्वसनाच्या तक्रारी कमी करते
सर्दी, खोकला, घशाचे दुखणे यावर फायदेशीर आहे. श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
हेही वाचा : Weight loss tips: उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय खावे?
5. डायबेटीस नियंत्रणात मदत
काळी मिरी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
6. त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
काळी मिरी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. डाग आणि मुरुमांवरही उपयुक्त आहे.
7. वजन कमी करण्यास मदत
काळी मिरी दुधात टाकून प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढते. ज्यामुळे चरबी कमी होते. चरबीचे ऑक्सिडेशन जलद होते.
8. झोपेची समस्या दूर करते
दूध आणि काळी मिरी मिळून शरीर शांत ठेवतात, ज्यामुळे चांगली झोप लागते. अनिद्रा आणि मानसिक तणाव दूर होतो.
कसे घ्यावे?
एक कप गरम दुधात 2-3 दाणे काळी मिरी पूड करून मिसळा.
चव वाढवण्यासाठी हळद किंवा मधही घालू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्यायल्यास अधिक फायदा होतो.
हे घरगुती उपाय नियमित केल्यास अनेक आरोग्यदायी लाभ मिळू शकतात.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.