Summer lip care tips : उन्हाळ्यात ओठ फाटण्याचा त्रास? घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय
Summer lip care tips : सद्या सुर्यदेव आग ओकत असून तापमानात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. या कारणानं शरीरातील पाण्याचं प्रमाण घटतं. दुसरीकडं वाढती धूळ-मळ यामुळं उन्हाळ्यात फक्त त्वचा नव्हे तर ओठांचेही आरोग्य धोक्यात येते. अनेकांना सतत कोरडेपणा ताण किंवा ओठ फाटण्याचा त्रास जाणवतो. पण ही केवळ सौंदर्यविषयक तक्रार नसून वेळीच उपाय न केल्यास संसर्ग, जळजळ, अगदी जखम होण्याचा धोका देखील संभवतो. काही घरगुती उपाय आणि योग्य देखभाल केल्यास या त्रासावर सहज मात करता येते. ते उपाय कोणते आहेत. याचा आढावा आपण या लेखातून घेऊयात...
बाजारात मिळणारे लिप बाम किंवा लिपस्टिक ही उपाययोजना तात्पुरती ठरते. त्यात असणारे केमिकल्स काही वेळ ओठ मऊ करतात. पण दीर्घकालीन वापरामुळं ओठ अधिक कोरडे पडू शकतात. म्हणूनच नैसर्गिक व घरगुती उपायांकडे वळणे हा अधिक प्रभावी पर्याय ठरतो.
खोबरेतेल फायदेशीर
खोबरेल तेलात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक ओठांतील सूज आणि कोरडेपणा कमी करतात. झोपण्यापूर्वी ओठांवर हलक्या हाताने तेल लावल्यास सकाळी ओठ मऊ वाटतात.
हेही वाचा - how to choose good coconut : नारळात पाणी जास्त की मलाई?, ‘या’ सोप्या ट्रिक्सनं सहज ओळखा
मध लावल्यास ओठ होतील बरे
मध हा एक नैसर्गिक जंतुनाशक आहे. १०-१५ मिनिटे मध लावून ठेवणे आणि नंतर मॉइश्चरायझर लावल्याने ओठ लवकर बरे होतात.
हेही वाचा - अंडरवेअरशिवाय घराबाहेर पडलात तर थेट जेल; जाणून घ्या 'या' देशाचे विचित्र नियम
कोरफड गुणकारी
घरोघरी सहज मिळणारी कोरफड ही तर ओठासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रोज रात्री कोरफडीचे जेल लावल्यास ओठांतील जळजळ आणि खवखव कमी होते.
गुलाबपाणी आणि तूपही उपयुक्त
गुलाबपाणी हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करत असल्याने ओठ हायड्रेट ठेवण्यास मदत होते. तूपाचा वापरही नैसर्गिक मॉइश्चरायझरप्रमाणे करावा. रात्री झोपताना थोडे तूप लावल्यास सकाळी ओठांतील कोरडेपणा जाणवत नाही.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)