Side Effects of Eating Refrigerated: फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने खाल्लेली किंवा साठवलेली फळे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. हल्ली बहुतेक लोक बाजारातून फळे आणतात आणि बराच काळ फ्रिजमध्ये ठेवतात. पण असे केल्याने फळांचे पौष्टिक घटक नष्ट होऊ शकतात. इतकेच नाही तर त्यांच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, चवीलाही त्यांचा स्वाद खराब लागू शकतो.
शक्यतो, ज्या भाज्या आणि फळे फ्रिजमध्ये न ठेवता सामान्य तापमानाला कोलीत टेवल्यानंतरी चांगल्या स्थितीत राहतात, ती फ्रिजमध्ये ठेवू नयेत. शिवाय, काही फळे तर, फ्रिजमध्ये ठेवण्याने आणि अशी पले खाल्ल्याने नुकसानच होते. तर, समजून घेऊ, अशा फळे कोणती आहेत, जी सामान्य तापमानाला साठवून ठेवावीत.
हेही वाचा - पोटाची चरबी कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग; दररोज फक्त 1 मिनिट या पोझिशनमध्ये राहा.. बस्स!
डाळिंब
डाळिंब फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यांना थंड तापमानात ठेवल्याने डाळिंबातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्याची साल ओलाव्यामुळे सडू शकते. जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास डाळिंबाच्या बिया कडक होतात. हे खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळा, सोललेले डाळिंबाचे दाणे फ्रिजमध्ये ठेवले जातात. मात्र, डाळिंबाचे दाणे नेहमी ताजे सोललेले खावे.
केळी
फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे फळ खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो. कारण केळी फ्रीजमध्ये ठेवली की थंड तापमानामुळे त्याची पिकण्याची प्रक्रिया मंदावते. थंडीमुळे त्यात असलेले स्टार्च साखरेत बदलू लागते.
अॅव्होकाडो
या फळात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. पण या फळात फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. अशा परिस्थितीत, जेव्हा ते फ्रीजमध्ये ठेवले जाते तेव्हा ते आतून खराब होऊ लागते.
टरबूज
अनेक लोक टरबूज खाल्ल्यानंतर अर्धा शिल्लक राहिल्यावर फ्रीजमध्ये ठेवतात. कापलेले टरबूज फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण थंडीमुळे त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स जसे की, लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीन कमी होऊ लागते.
हेही वाचा - Hibiscus Tea : जास्वंदाचे फूल आरोग्यासाठी वरदान! आयुर्वेदात सांगितलंय याचं महत्त्व
अननस
फ्रीजमध्ये ठेवल्यास अननस देखील कडवट होऊ शकते. म्हणून, ते खोलीच्या तापमानावर ठेवावे. फ्रीजमध्ये अननस ठेवल्याने त्याचा गोडवा कमी होऊ शकतो. अननसही डाळिंबाप्रमाणेच शक्यतो ताजे कापून खाल्लेले चांगले. तसेच, न कापलेले अननस फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. म्हणून, ही फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याऐवजी खोलीच्या तापमानावर ठेवावीत.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)