Sunday, August 17, 2025 04:56:48 AM

NAVI MUMBAI: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्याच एका मैत्रिणीने अपहरण करून दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

navi mumbai 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कविता लोखंडे. प्रतिनिधी. नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्याच एका मैत्रिणीने अपहरण करून दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. माहितीनुसार, पीडित मुलगी दिवसभर घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हेही वाचा: अज्ञातांकडून पत्रकारांसह वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला; 11 जणांवर गुन्हे दाखल

पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला आणि अल्पवयीन मुलीच्या ओळखीतील मित्रांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, पोलिसांना तिच्या 20 वर्षीय मित्रावर संशय आला. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


सम्बन्धित सामग्री