Sunday, August 17, 2025 01:51:06 AM

एअर इंडियाचा निर्णय: पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित

पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय.

एअर इंडियाचा निर्णय पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित

Flight Suspension: पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे सिंगापूरला जाणाऱ्या पुण्यातील प्रवाशांना मुंबई अथवा दिल्ली येथून प्रवास करावा लागत आहे. पुणे-सिंगापूर मार्गावरून आठवड्यातील पाच दिवस नियमित सेवा दिली जात होती. या विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.

मात्र, अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील विमानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव 24 जूनपासून 15 जुलैपर्यंत पुणे-सिंगापूर विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. आता सुरक्षा आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कारणांमुळे ही सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडियाकडून घेण्यात आला आहे.

हेही वाचा: संवर्धनाऐवजी नियंत्रण? वाघांच्या वाढीवर बंदी; नेमका प्रकार काय जाणून घ्या

सिंगापूरसाठी पुण्यातून थेट सेवा असल्यामुळे अनेक प्रवासी या मार्गाचा लाभ घेत होते. परंतु सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागत आहे. त्यांना मुंबई किंवा दिल्ली येथून सिंगापूरसाठी विमान पकडावे लागत आहे, यामुळे प्रवासात अतिरिक्त वेळ आणि खर्च वाढत आहे.

पुण्यातून सध्या दुबई, सिंगापूर आणि बँकॉकसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. सिंगापूरसाठीची सेवा बंद झाल्यामुळे पुण्यातील प्रवाशांना फटका बसला असून या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. विमानसेवा केव्हा पुन्हा सुरू होईल, याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.

एअर इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये निराशा पसरली असून सिंगापूरसाठीच्या थेट विमानसेवेचा लाभ घेण्याची संधी काही काळासाठी बंद झाली आहे.
 


सम्बन्धित सामग्री