Sunday, August 17, 2025 04:37:06 PM

संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. कुणाल बाकलीवालला पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. व्यावसायिकाची फसवणूक करुन गुंडांकडून मारहाण करत जीवे मारहाण्याची धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांशी अरेरावी त्याने केली होती.  

संभाजीनगरात वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकविणाऱ्या बांधकाम व्यवसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल याच्यावर बारा दिवसातच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. व्यवसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दुसरा गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बाकलीवालच्या घरी दोन वर्षांपूर्वी धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे 16 लाख रुपये बिल देण्यास बाकलीवालने नकार दिला.पैशांची मागणी केल्यानंतर बाकलीवाल हा त्या व्यवसायिकाला धमकावत होता.

हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केला खळबळजनक खुलासा
 

वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या बाकलीवालला पुन्हा एकदा अटक 

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या  कुणाल दिलीप बाकलीवाल याला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. कुणाल दिलीप बाकलीवाल हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्यावर बारा दिवसातच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. व्यवसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे कुणालवर दुसरा गुन्हा दाखल करत सातारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे .विशेष बाब म्हणजे बाकलीवालच्या घरी दोन वर्षांपूर्वी धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे 16 लाख रुपये बिल देण्यास बाकलीवालने नकार दिला.पैशांची मागणी केल्यानंतर बाकलीवाल हा त्या व्यवसायिकाला धमकावत होता.त्यामुळे पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. 


सम्बन्धित सामग्री