Wednesday, June 18, 2025 02:30:30 PM

नागपूरात मराठीला अनोख्या पद्धतीने सन्मान; वाहतूक नियमनात मराठीचा नवा शिरकाव

नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.

नागपूरात मराठीला अनोख्या पद्धतीने सन्मान वाहतूक नियमनात मराठीचा नवा शिरकाव

तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. प्रत्येक चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहेत. 

हेही वाचा: पती-पत्नी आणि मर्डर; मधुचंद्रासाठी गेलेल्या बेवफा सोनमने केली पतीची हत्या

इंटेलिजन ट्राफिक सिस्टीम अंतर्गत प्रत्येक चौकात अत्याधुनिक ट्राफिक सिग्नल लावण्यात येत आहे. या ट्राफिक सिंग्नलवर चालत्या वाहनांची नंबर प्लेट स्कॅनर करण्याची व्यवस्था तर आहेच. पण महत्वाचे म्हणजे रेड लाईट आणि ग्रीन लाईट वाचकांसाठी वेगळ्या पद्धतीने दर्शवण्यात आला आहे. रेड लाईट असतांना 'थांबा' हा सिंग्नल दिला जात आहे आणि ग्रीन लाईट असेल 'जा' ब्लिंकिंग करून सिंग्नल दिला जात आहे. यामागील उद्देश म्हणजे ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहून वाहनचालकांची सतर्कता वाढवणे आणि सिग्नलवर डम्पिंगचे प्रकार थांबावे असे आहे. सध्या नागपूर महानगर पालिकेकडून हे ट्राफिक सिंग्नल बदलीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

हेही वाचा: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी पडले खाली


सम्बन्धित सामग्री