Saturday, August 16, 2025 11:28:19 PM

Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 25 जुलै रोजी 24 तासांची पाणीकपात जाहीर

एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे.

thane water cut ठाणेकरांनो लक्ष द्या 25 जुलै रोजी 24 तासांची पाणीकपात जाहीर
Thane Water Cut
Edited Image

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेने 25 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे. 

टीएमसीने सांगितले की, घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कंपाउंड, डोंगरी पाडा, वाघबिल आणि आसपासचे परिसर हे या बंदीग्रस्त भागांमध्ये येतात. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच आवश्यक पाणी आगाऊ साठवून ठेवावे, असे आवाहनही टीएमसीने केले आहे. 

याआधी 22 जुलै रोजी ही दुरुस्ती होणार होती, मात्र STEM प्राधिकरणाने ती 25 जुलैपर्यंत पुढे ढकलली. जय भवानी नगर पंप हाऊसमधून वाघळे आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समित्यांमधील पाणीपुरवठा केला जातो. परंतु, दुरुस्तीच्या कामामुळे समतानगर, रितू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, कळवा व मुंब्रा भागांत 25 जुलै रात्री 9 ते 26 जुलै सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा 'माझ्या वडिलांना अडकवण्यासाठी खडसे जबाबदार'; प्रफुल्ल लोढाच्या मुलाने केला खळबळजनक दावा

शहाड पंपिंग स्टेशनवर पाण्याचे मीटर बदलण्यात येणार असून, पाईपलाइनमधील गळती थांबवण्यासाठी आणि महावितरणच्या देखभाल कामांसाठी ही पाणी कपात आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. टीएमसीने सांगितले की, 26 जुलैनंतर काही काळ पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - पूजा खेडकर यांना मोठा धक्का! नॉन-क्रीमी लेयर OBC प्रमाणपत्र अवैध घोषित 

तथापी, महापालिकेने X वर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'मंगळवारऐवजी शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी येणार नाही. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याच्या पाईपलाईनच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे पाणीकपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, जर मंगळवारी STEM प्राधिकरणाने शटडाऊन केला तर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.' 
 


सम्बन्धित सामग्री