Sunday, August 17, 2025 05:03:36 AM

दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिका अटकेत; शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस कारवाईनंतर पालकांचे आंदोलम शमले आहे.

दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिका अटकेत शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे:  शहापूरमधील दमानिया शाळेत शौचालयात रक्त दिसल्याने विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्यात आली. यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालकांनी शाळेबाहेर आणि पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर या प्रकरणात दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस कारवाईनंतर पालकांचे आंदोलम शमले आहे. 

शहापूरातील आर. एस. दमानिया इंग्रजी शाळेमध्ये मासिक पाळीसंदर्भात घडलेल्या घृणास्पद प्रकारासंदर्भात शेकडो पालकांनी शाळेवर मोर्चा काढला. मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं आणि पोलिस स्टेशनसमोरही ठिय्या मांडत आंदोलन केलं. त्यानंतर मुख्याध्यापक, दोन विश्वस्त, चार शिक्षक आणि एक शिपाई मावशी अशा आठ जणांवर पोलिसांकडून पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुख्यध्यापिका आणि शिपाई मावशींना अटक करण्यात आली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना निलंबित देखील करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिली. 

हेही वाचा: दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी केल्याच्या घटनेवर महिला नेत्या संतापल्या

शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल

शहापूरातील आर. एस. दमानिया इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुलींच्या मासिक पाळी संदर्भात घडलेल्या घृणास्पद प्रकारानंतर शेकडो पालकांनी शाळेवर मोर्चा काढला. तसेच शाळा प्रशासनाला व मुख्याध्यापिका यांना घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. यावेळी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्याध्यापिका व शिपाई यांना ताब्यात घेतले. पालकांनी शाळेतून‌ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडत मुख्याध्यापिक, दोन विश्वस्त, चार शिक्षक व एक शिपाई मावशी अशा आठ जणांवर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यध्यापिका व शिपाई मावशी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिली. पोलिसांनी सदरच्या घटनेची अतिशय चांगल्या प्रकारे दखल घेतल्याने पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री