नागपूर: देहव्यापाराचा अड्डा चालवणारा बापलेक गजाआड आहेत. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. नागपुरातील बेसा मार्गावरील हॉटेलात देहव्यापार सुरु होता. या प्रकरणी हूडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील बेसा मार्गावरील ओयो हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या बाप आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. प्रज्वल सचिन टुले आणि सचिन गंगाधर टुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा: ढाब्यावरून जेवण करून जाताना भीषण अपघात, 3 ठार, 2 गंभीर जखमी
नागपूरात दोघेही बापलेक दत्तधाम नगर ओयो ग्रीन गेस्ट हाऊस येथे देहव्यापाराचा अड्डा चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी दोन महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली असून आरोपीच्या ताब्यातून मोबाईल फोन जप्त करून त्यांच्याविरुद्ध हूडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
देहव्यापाराचा पर्दाफाश, बापलेक गजाआड
नागपूरातील बेसा मार्गावरील एक हॉटेलात देहव्यापाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ओयो हॉटेलमध्ये देहव्यापाराचा धंदा चालवणाऱ्या बापलेकाला पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिलांकडून हे बापलेक देहव्यापाराचा धंदा करुन घेत होते. ज्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी दोन महिलांकडून देहव्यापार करुन घेत असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी या दोन महिलांची सुटका केली. तसेच आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. हूडकेश्वर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत प्रज्वल टुले आणि सचिन टुले या बापलेकाला अटक करण्यात आली आहे.