Sunday, August 17, 2025 03:59:40 PM

महिला दिनी न्यायासाठी लढा! झारगडवाडीतील महिलांचे बारामतीत उपोषण

झारगडवाडीतील महिलांचा आरोप आहे की, शासनाकडून मंजूर झालेल्या रस्त्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी  अडथळा आणला आहे.

महिला दिनी न्यायासाठी लढा झारगडवाडीतील महिलांचे बारामतीत उपोषण

 

बारामती: बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर जागतिक महिला दिनी झारगडवाडी गावातील महिलांनी आपल्या हक्कासाठी लढा उभारला आहे. गावासाठी मंजूर झालेला रस्ता राजकीय द्वेषातून रोखण्यात आला असून, त्याचा निषेध म्हणून या महिलांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

झारगडवाडीतील महिलांचा आरोप आहे की, शासनाकडून मंजूर झालेल्या रस्त्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी  अडथळा आणला आहे. मानसिक त्रास आणि राजकीय सूड या गोष्टींना महिलांना सामोरे जावे लागत आहे. या अन्यायाविरोधात महिलांनी थेट बारामती प्रशासकीय भवनासमोर ठिय्या मांडला असून, त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या महिलांना जागतिक महिला दिनीच न्याय मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत या आंदोलनाची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे.

महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत, तर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल. 


सम्बन्धित सामग्री