Saturday, August 16, 2025 04:51:29 PM

मुंबईत GBS चा पहिला बळी! BMC रुग्णालयातील 53 वर्षीय वॉर्ड बॉयचा मृत्यू

वडाळा येथील 53 वर्षीय मृत व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बी.एन. देसाई रुग्णालयातील वॉर्ड बॉय होता. त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबईत gbs चा पहिला बळी bmc रुग्णालयातील 53 वर्षीय वॉर्ड बॉयचा मृत्यू
Mumbai Reports 1st Death Due To GBS
Edited Image

Mumbai Reports 1st Death Due To GBS: मुंबईतून अत्यत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठ झाली आहे. वडाळा येथील 53 वर्षीय मृत व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बी.एन. देसाई रुग्णालयातील वॉर्ड बॉय होता. त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, अखेर या आजाराची लागण झालेल्या या रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला.

यापूर्वी मुंबईत 64 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याचं आढळलं होतं. या महिलेला अतिसार आणि तापाचा इतिहास होता, त्यानंतर या महिलेला पक्षाघात झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार, केवळ पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 197 वर पोहोचली आहे. आता जीबीएसमुळे महाराष्ट्रात मृतांची एकूण संख्या आठ झाली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियम 2019 मध्ये दुरूस्ती

दरम्यान, पुणे महानगरपालिकेने (PMC) वाढत्या GBS प्रादुर्भावाच्या प्रतिसादात जलद कारवाई केली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड गाव, धायरी आणि जवळपासच्या भागात असलेले 30 खाजगी पाणीपुरवठा प्रकल्प अधिकाऱ्यांनी सील केले आहेत. हे भाग साथीच्या रोगाचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहेत. या प्रकल्पांमधून गोळा केलेले पाण्याचे नमुने वापरण्यास अयोग्य असल्याचे आढळले. त्यानंतर हे प्रकल्प बंद करण्यात आले. 

हेही वाचा - सावंतांच्या मुलाने एका ट्रीपसाठी दिले तब्बल 68 लाख

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे - 

गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या पहिल्या लक्षणांमध्ये अशक्तपणा किंवा मुंग्या येणे यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, काही लोकांमध्ये, या लक्षणांमुळे पाय, हात किंवा चेहऱ्यावरील स्नायूंना अर्धांगवायू होऊ शकतो. अंदाजे एक तृतीयांश लोकांमध्ये, जीबीएसमुळे छातीच्या स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. 
 


सम्बन्धित सामग्री