Sunday, August 17, 2025 03:59:35 PM

IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या पराभवाने नीता अंबानींना कोट्यवधींचा तोटा; फायनलमध्ये न पोहोचल्यामुळे गमावले ‘हे’ कमर्शियल फायदे

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचू शकले नाही, ज्यामुळे नीता अंबानींना आर्थिक आणि ब्रँड मूल्याचा मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

ipl 2025 मुंबई इंडियन्सच्या पराभवाने नीता अंबानींना कोट्यवधींचा तोटा फायनलमध्ये न पोहोचल्यामुळे गमावले ‘हे’ कमर्शियल फायदे

IPL 2025: IPL म्हणजे फक्त क्रिकेटचा खेळ नव्हे तर एक भव्य व्यवसाय मॉडेल बनले आहे. प्रत्येक सिझनमध्ये केवळ खेळाडू नव्हे तर त्यांच्या संघाचे मालकसुद्धा कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. पण जसे यशात नफा असतो तसाच अपयशात मोठा तोटाही होतो. यंदा IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी यांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. कारण, मुंबई इंडियन्स या सिझनच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही.

1 जून रोजी झालेल्या सेमीफायनल सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता अंतिम लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगणार आहे. मात्र या सामन्यातून बाहेर पडल्याने नीता अंबानींना केवळ स्पर्धात्मकच नव्हे तर मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे.

फायनलमध्ये स्थान मिळवू न शकण्याचा नेमका काय तोटा?

IPL फायनल हा इतर कोणत्याही सामन्यापेक्षा अधिक महत्त्वाचा मानला जातो. या सामन्याच्या तिकिटांची किंमत इतर सामन्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. फक्त तिकीट विक्रीतूनच करोडो रुपये कमाई होते. त्याचप्रमाणे, फायनलसाठी स्पॉन्सरशिप डील्स, ब्रँड एंगेजमेंट्स, मर्चेंडायजिंग आणि डिजिटल व्यूअरशिप यामधूनही मोठा महसूल मिळतो. एका अंदाजानुसार, मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचली असती, तर त्यांना किमान 50 ते 70 कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यवसायिक लाभ झाला असता. मात्र आता तो संपूर्ण नफा गमावण्यात आला आहे.

बक्षीस रक्कमही गमावली

IPL च्या अंतिम विजेत्या संघाला मोठे बक्षीस दिले जाते. 2024 मध्ये विजेत्या संघाला सुमारे 20 कोटी तर उपविजेत्या संघाला सुमारे 13 कोटी रुपये बक्षीस मिळाले होते. ही रक्कम संघ मालक आणि खेळाडूंमध्ये वाटली जाते. मात्र, मुंबई इंडियन्स फायनलमध्ये न पोहोचल्यामुळे ही संभाव्य बक्षीस रक्कमही गमावली .

टीमवर होतो कोट्यवधींचा खर्च

मुंबई इंडियन्स हा IPL मधील सर्वाधिक खर्चिक संघांपैकी एक आहे. नीता अंबानी यांचा फोकस दर्जेदार खेळाडूंवर मोठ्या रकमेत गुंतवणूक करण्यावर असतो. त्यासाठी फ्रँचायझी खरेदी, ट्रेनिंग, मार्केटिंग आणि व्यवस्थापन यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अशा मोठ्या गुंतवणुकीनंतर संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही, याचे आर्थिक पडसाद निश्चितच मोठे असतात.

नफा गेला, ब्रँड व्हॅल्यूवरही परिणाम

मुंबई इंडियन्सचा ब्रँड IPL मध्ये एक सशक्त प्रतिमा घेऊन चालतो. मात्र एका सिझनमध्ये खराब कामगिरी झाल्यास त्याचा प्रभाव स्पॉन्सरशीप डील्स, फॅन एंगेजमेंट आणि सोशल मीडिया मार्केटिंगवरही दिसतो. त्यामुळे या सिझनमधील पराभव नीता अंबानींसाठी केवळ एका सामन्याचा नव्हे, तर ब्रँड इमेजच्या दृष्टीनेही एक मोठा झटका ठरला आहे.


सम्बन्धित सामग्री