मालेगाव: मालेगाव शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाने नोटीस बजावली आहे. सामान्य रुग्णालयात उशिरा येणारे डॉक्टर आणि गैरहजर राहणारे डॉक्टर यामुळे गर्भवती महिलांसह इतर रुग्णांचे हाल होत आहेत. सामान्य गोरगरीब नागरिकांना योग्य उपचार मिळण्यासाठी शासकीय रुग्णालय हे एकमेव साधन आहे. मात्र, शासकीय रुग्णालयातच रुग्णाच्या जीवाशी खेळ होत असेल तर त्यांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सामान्य नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळे गोरगरीब, गरजू कष्टकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय रुग्णालय एकमेव साधन आहे. मात्र त्या ठिकाणी देखील रुग्णाच्या जीवाशी खेळलं जात असेल तर त्यांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मालेगाव शहर हे गोरगरीब, कष्टकरींचं शहर असल्याने येथे शहरात नियमित स्वच्छता होत नसल्याने कोणतेही आजार लवकर झपाट्याने मोठंरूप धारण करतात. मागील आठवड्यात सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड झाला असून गर्भवती महिलांच्या बाबतीत काही उशिरा येणारे डॉक्टर आणि ओपीडीमध्ये (OPD) गैरहजर व निष्काळजीपणा केल्याने डॉक्टर व नर्सेस यांना डॉ. योगेश पाटील यांनी नोटीसा बजावल्या.
हेही वाचा : प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्याचे पाटलांचे सूतोवाच; शशिकांत शिंदे, राजेश टोपेंच्या नावाची चर्चा
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गर्भवती महिलासह इतर रुग्णाच्या जीवाशी खेळ
गोरगरीब, गरजूसाठी असलेल्या मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गर्भवती महिला व इतर रुग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बाळंतपणासाठी आलेल्या सोनाली मोरे या महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू होऊन सुद्धा तिच्यावर उपचार करण्यात आले नाहीत असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर या महिलेवर उपचार करण्यात आले. या घटनेची चौकशी करून या महिलेवर उपचार करण्यासाठी जर हलगर्जीपणा करण्यात आला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले.