महाराष्ट्र: सद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य चांगलच चर्चेत आहे. महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत मात्र आता याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केल्याने चर्चेला चांगलेच उधाण आलेय. 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा, या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी सरकारची आर्थिक परिस्थिती नाही, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन हवेतच विरल्याची टीका विरोधकांनी केलीय..काहींनी निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण जे सांगितले ते प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे यंदाच्या सालची आणि पुढच्या वर्षीचेही पिककर्जाचे पैसे भरा. आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा: मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
काय म्हणाले मनोज जरांगे?
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार नसतील तर यांच्याकडे बघावं लागणार आहे. त्यांना गावात यायचं बंद करावे लागेल, ती मोहीम मला सुरु करावी लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठ्यांच्या आरक्षणानेन एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा एकजूट दाखवण्याची गरज आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य चांगलच चर्चेत आहे. महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत मात्र आता याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केल्याने चर्चेला चांगलेच उधाण आलं असून मनोज जरंगेंनी यावर प्रतिक्रिया दिलीय. त्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय.