Friday, July 11, 2025 11:25:49 PM

वैष्णवी हगवणे प्रकरणी पुणे पोलिसांचं हगवणे बंधूंना रेड कार्पेट ट्रीटमेंट?

वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणी पुणे पोलिसांचं हगवणे बंधूंना रेड कार्पेट ट्रीटमेंट

पुणे: राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्या केली. अशातच, वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे. सामान्य नागरिकांना सात महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत शस्त्र परवान्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र, हगवणे बंधूंना शस्त्र परवान्यासाठी एवढ्या कमी वेळेत कशी मंजुरी मिळाली? असा सवाल पुणे पोलिसांवर केला जात आहे.

हेही वाचा: सासरा सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणेंची पोलीस कोठडी आज संपणार

हगवणे बंधूंनी फ्लॅट भाड्याने घेतला?

12 ऑक्टोबर 2022 रोजी शशांक हगवणे यांनी पुण्यातील वारजे परिसरात केवळ 3500 रुपयांमध्ये 1 बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शशांक हगवणे यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्जही दाखल केला. शशांक हगवणे यांना 22 नोव्हेंबर 2022 रोजी शस्त्र परवाना मिळाला.

हेही वाचा: ठरलं तर मग; वैष्णवीची आई स्वाती कस्पटे करणार बाळाचं संगोपन

त्याचप्रमाणे, सुशील हगवणे यांनी देखील 28 सप्टेंबर 2022 रोजी कोथरूडमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुशील हगवणे यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. सुशील हगवणे यांना अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 रोजी शस्त्र परवाना मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की हगवणे बंधूंनी शस्त्र परवान्यासाठी खोटे पत्ते सादर केले होते.

​​​​​​​हेही वाचा: आरोपी निलेश चव्हाणला पु्ण्यात आणलं; आज न्यायालयात करणार हजर
 


सम्बन्धित सामग्री