Wednesday, July 09, 2025 08:44:15 PM

महसूल प्रशासनातील लाचखोरीची मालिका; महिनाभरात पाच अधिकाऱ्यांवर कारवाई

महसूल विभागातील लाचखोरीच्या चार गंभीर प्रकरणांनी प्रशासनाची प्रतिमा मलीन केली आहे. क्लास वन अधिकारी, लिपिक आणि एजंट अटकेत, जनतेत असंतोषाचं वातावरण निर्माण.

महसूल प्रशासनातील लाचखोरीची मालिका महिनाभरात पाच अधिकाऱ्यांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील महसूल विभाग सध्या गंभीर लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत क्लास वन दर्जाचे तीन अधिकारी, एक लिपिक आणि दोन खासगी एजंट लाच घेताना अडकले आहेत. यामुळे महसूल प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली असून, जनतेमध्ये प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.

अधिकाऱ्यांना शासनाकडून दिले जाणारे भरघोस वेतन असूनही, ते लाच मागतात आणि घेतात, ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. या लाचखोरीच्या प्रकारांमुळे महसूल विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. यापैकी अनेक अधिकाऱ्यांचे खासगी वसुली एजंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर काही अधिकाऱ्यांनी मर्जीतील कर्मचाऱ्यांची बदली करून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेमले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची कार्यालये उभारली असल्याचेही उघडकीस आले आहे.

हेही वाचा: Mumbai IMD Weather Alert: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, IMD कडून ऑरेंज अलर्ट

महिनाभरातील लाचखोरीची प्रकरणे:

1. निवासी उपजिल्हाधिकारी: विनोद खिरोळकर त्यांनी तब्बल 18 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणात 5 लाख रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

2. लिपिक दिलीप त्रिभुवन: त्याच प्रकरणात 18 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांनी देखील 5 लाख रुपये घेताना अटक झाली आहे.

3. अपर तहसीलदार नितीन गर्ने:  यांच्याविरोधात 60 हजार रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांचे दोन खासगी एजंट (पंटर) अटकेत आले आहेत.

4. पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे: यांना 40 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे.

या साऱ्या घटनांनी महसूल प्रशासनाची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन केली आहे


सम्बन्धित सामग्री