Sunday, August 17, 2025 04:36:28 PM

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी हल्ला प्रकरण; 9 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात 9 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी हल्ला प्रकरण 9 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

लातूर : शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात 9 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी सर्वप्रथम ही बातमी दाखवली होती. या बातमीची दखल घेत आज 9 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित कुटुंबाने जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानले आहेत. 

लातूरच्या कासार जवळा येथील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्यानंतर गातेगाव पोलिसांनी पीडित शेतकऱ्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याची बातमी समोर आली होती. 5 एप्रिल रोजी 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसारित केली होती. उशिरा जाग आलेल्या पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करत 9 आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे लातूरमध्ये 'जय महाराष्ट्र' च्या बातमीचा मोठा दणका पाहायला मिळत आहे. नवनाथ चव्हाण असे पीडित शेतकऱ्याचे नाव असून मुख्य आरोपी महादेव चव्हाण याच्यासह 9 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा : दोन तिरड्यांवर निघाली चौघांची अंत्ययात्रा; वैद्य कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

लातूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर एका टोळीने प्राणघातक हल्ला केला. यानंतर पीडित शेतकऱ्याचे कुटुंब पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर उशिरा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आता अखेर 9 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री