मुंबई: सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
सोमवारी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यावेळी चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी महायुती सरकारमधील सर्व मंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हजर राहणार आहेत.
हेही वाचा: Panvel: नवजात अर्भक रस्त्यावर सोडणारी महिला सापडली
आज सकाळी महाविकास आघाडीचे अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक आहे. त्यामुळे विरोधक चहा पानाच्या कार्यक्रमासाठी जातात की बहिष्कार टाकतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही उपस्थित राहणार आहेत. यावेळी पावसाळी अधिवेशनासंदर्भात रणनीती आखली जाणार आहे. विरोधकांना कशा प्रकारे अधिवेशनात घेरायचं? यावर चर्चा होणार आहे. राज्यमंत्री मंडळातील मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. हिंदी सक्तीसंदर्भातही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.