Sunday, August 17, 2025 05:11:44 PM

प्रशांत कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळणार?

इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे.

प्रशांत कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळणार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली. तसेच इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यामुळे कोरटकर अडचणीत आला आहे. सोमवारी त्याला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कोल्हापूर पोलीस स्थानकात आणण्यात आले असून आज इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे. 

बऱ्याच दिवसांपासून पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधात होते. यापूर्वी कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यामुळे कोरटकरने पळ काढला आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. आज न्यायालयात इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणावर सुनावणी झाली. इंद्रजीत सावंत यांच्याकडून वकील असीम सरोदे यांनी बाजू मांडली तर प्रशांत कोरटकर याच्याकडून  वकील सतीश घाग यांनी बाजू मांडली. 

हेही वाचा : प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

'कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या'
वकील असीम सरोदेंकडून इंद्रजित सावंत यांची बाजू मांडली. कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचे सरोदे यांनी म्हटले. आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा अशी मागणी सरोदे यांनी न्यायालयाकडे केली. तसेच प्रशांत कोरटकरला पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली आहे. कोरटकरने शिवरायांचा अपमान केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. पळून गेलेल्या वाहनाची चौकशी करायची आहे तसेच मालकाचीही चौकशी करायची आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांची मागणी विचारत घेऊन कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या असे सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. 

कोल्हापूर पोलिसांचा अटकेसाठी अट्टाहास का?

प्रशांत कोरटकरचे वकील सतीश घाग यांनी न्यायालयात बाजू मांडली. प्रकरण गंभीर नाही असा युक्तिवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केला. कोरटकरवर लावलेल्या कलमात अटकेची गरज नव्हती. कोल्हापूर पोलिसांचा अटकेसाठी अट्टाहास का? असा सवाल कोरटकरच्या वकीलांनी केला. तसेच तपासात सहकार्य करणार, असं सांगूनही अटक का? असा प्रश्न वकिलांनी पोलिसांना केला.  

दरम्यान कोल्हापूरातील जुना राजवाडा परिसरातील पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरटकरविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र  पाहायला मिळत आहे. कोरटकरला सोमवारी तेलंगणातून अटक केल्यानंतर कोल्हापूर आणले. त्यामुळे पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. शिवप्रेमींनी हातात कोल्हापुरी चप्पल घेत कोरटकरचा निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवप्रेमींचा संताप झाला आहे. दरम्यान पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची सुरू आहे. 


सम्बन्धित सामग्री