बीड: बीडमधून सद्या गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ समोर आले. सद्या बीडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढतांना दिसून येतंय. वाल्मिक कराडच्या टोळीनंतर आता आणखी एका टोळीचा पर्दाफाश झालाय. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला. वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता अजून दुसऱ्या एका टोळीवर मकोका लावण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे या टोळीत तीन महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा: नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला..
याबाबत अधिक माहिती अशी की, या टोळीतील आरोपींमध्ये दीपक उर्फ सलीम भोसले, सोमनाथ उर्फ दिलीप काळे, मन्सूर पठाण त्याचबरोबर सोनी उर्फ अनिता भोसले, शशिकला भोसले आणि संद्या भोसले यांचा समावेश आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे या टोळीविरोधात बीडसह अनेक जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या टोळीविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. बीडमधून सद्या गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ समोर आले. सद्या बीडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढतांना दिसून येतंय. वाल्मिक कराडच्या टोळीनंतर आता आणखी एका टोळीचा पर्दाफाश झालाय. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला. वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता अजून दुसऱ्या एका टोळीवर मकोका लावण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे या टोळीत तीन महिलांचा समावेश आहे. आता यांसारखे असे किती प्रकरण समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणारे.