लातूर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्याचे चित्र आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा लातूरमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. रेणापुरात हा मोर्चा काढण्यत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा या मोर्चात उपस्थित आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सकल मराठा समाजाने मस्साजोग गावच्या सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरमधील रेणापुरात मोर्चा काढला आहे. या मोर्चात सरपंच देशमुख यांच्या मुलांचाही सहभाग आहे. यावेळी मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी भावूक झाली. आमच्यावर जी वेळ आली ती कुणावर येऊ नये. तसेच वडील आमच्यातून गेलेत मात्र तुम्ही आमच्या पाठीशी राहा असे भावूक उद्गार संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने काढले आहेत.
काय म्हणाली वैभवी देशमुख?
माझ्या वडिलांची हत्या झाल्यानंतर आपण एकत्रित आलात ते असेच राहो. आज आमच्यावर जी वेळ आली ती कोणावर येऊ नये. माझे वडील समाजसेवक होते, त्यांनी आमच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. रेणापूर हे माझे आजोळ आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आज ज्याप्रमाणे आलात त्याप्रमाणे प्रत्येक मोर्चात सहभागी व्हा. माझे वडील आमच्यातून गेलेत पण तुम्ही आमच्या पाठीशी राहा असे संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाली.
हेही वाचा : 'मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जातंय'
बीडमध्येही उद्या बंद ठेवण्यात आला आहे. देशमुख हत्या प्रकरणात उद्या बीडमध्ये सर्व पक्षीय नेत्यांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. शरद पवार, मनोज जरांगेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. भाजपा आमदार सुरेश धसही या मोर्चात सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. मोर्चावर पोलिसांची बारीक नजर असणार आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकरांनी दिली आहे.