Sunday, April 20, 2025 06:09:59 AM

लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळण्याबाबत स्पष्टच बोलले उपमुख्यमंत्री शिंदे

राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर  लाडक्या बहिणींना 2100 मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळण्याबाबत स्पष्टच बोलले उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना दरमहा 1500 रूपये अर्थसहाय्य करत आहे. राज्य सरकारने महिला देणाऱ्या 1500 रूपयांमध्ये वाढ करून 2100 रूपये देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही 2100 रूपये दिले जात नाहीत. यावरून विरोधक नेहमी सरकारला प्रश्न विचारत असते. तसेच लाडकी बहीण योजना आणल्यामुळे सरकारवर कर्जाचे ओझे असल्याचेही टीका केली जाते. त्यातच आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर  लाडक्या बहिणींना 2100 मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

लाडकी बहीण योजनेमुळे सातत्याने राज्य सरकारवर ताशेरे ओढले जातात. सरकार ही योजना बंद पाडणार असल्याची टीकाही वारंवार पाहायला मिळते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. तसेच राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : 27 मार्चपासून घरकुल सुरू करण्यासाठी विशेष अभियान; शहरी व ग्रामीण घरकुलांना गती

लाडक्या बहिणींना काय म्हणाले शिंदे?
कुठलीही योजना बंद होणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानभवनात सांगितलं. महाराष्ट्रातल्या बहिणींना नक्कीच न्याय मिळेल. महाराष्ट्र स्टार्टअप, जीडीपी सगळ्यात पुढे आहे. अनेक प्रकल्प आपण उभारत आहोत. परदेशी गुंतवणूक आणत आहोत. त्या माध्यमातून आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. अजित पवारांनी जे अर्थसंकल्प मांडलेला आहे. ते योग्य आहे आणि त्या पद्धतीने आपल्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे  त्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणीने पैसे मिळणार आहेत. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याचे शिंदे म्हणाले. 

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. जुलै 2024 पासून राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रूपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्यता करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रूपये देणार असल्याची घोषणा केली होती. लवकरच राज्यातील महिलांना दरमहा 2100 रूपये मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे. 


 


सम्बन्धित सामग्री