जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावाच्या माजी उपसरपंचाची निघृण हत्या करण्यात आली. चॉपर आणि चाकूने भोसकल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण जळगाव हादरलं आहे. जळगावजवळील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची हत्या केली. त्यांना चॉपर आणि चाकूने भोसकल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. युवराज सोपान कोळी असे मृत उपसरपंचांचे नाव आहे. या हत्येमुळे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर पसरला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोळी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.
जळगावातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळच्या सुमारास झाली आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावातीलच तिघांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.
हेही वाचा : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यानं केली मारहाण; बीड पोलिसांनी तिघांवर केली कारवाई
गुलाबराव पाटलांची कोळी कुटुंबियांना सांत्वनपर भेट
जळगावजवळील कासनवाडा गावाचे माजी उपसरपंच तथा शिवसेनेचे कार्यकर्ते युवराज कोळी यांचा आज सकाळी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय युवराज कोळी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना केल्या.
जळगावात बीडच्या घटनेची पुरावृत्ती
बीडच्या घटनेची पुरावृत्ती जळगावमध्ये झाली आहे. जळगावमध्ये कानसवाडा गावात माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली. भरदिवसा त्यांच्यावर चाकूने वार करत त्यांना बळी घेतला गेला. या घटनेने परिसरात हाहाकार माजला आहे. तेथील लोक घाबरले आहेत. माजी उपसरपंचाच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. राज्यात हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा कायद्याचा धाक न उरलेला नसल्याचे चित्र दिसून आले आहे. तीन महिन्यापूर्वी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचीही निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण बीड हादरले होते. संपूर्ण राज्यात देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा आहे. त्यांच्या हत्येनंतर राज्यात मोर्चे काढण्यात आले. त्यांना न्याय मिळण्यासाठी आतोनात प्रयत्न करण्यात येत आहेत. ही घटना ताजी असतानाच जळगावाच माजी उपसरपंचाच्या हत्येची घटना घडली आहे. या हत्येमुळे राज्यातून संताप व्यक्त होत आहे.