गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक राज्यात कोयता गॅंगच्या घटना घडत आहेत. आधी संभाजीनगर आणि आता विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. एकेकाळी रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या या कोयता गँगने आता नागरिकांच्या घरातच घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. कोयता गॅंगच्या वाढत्या दहशतींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत. नुकताच, कोयता गॅंग पुण्यातील एका घरात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र सुदैवाने, ती व्यक्ती घरात नसल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे, हे प्रकरण कोणत्या कारणामुळे झाला असावा? चला तर जाणून घेऊया.
'या' कारणामुळे झाला वाद:
चहाच्या टपरीवर दोन तरुणांचा पैशांवरून वाद झाला. काही वेळाने, हा वाद शिवीगाळमध्ये बदलला.
'बळीराम कुठे आहे?' आरोपीने वडिलांना विचारले:
काही वेळाने, संबंधित आरोपी त्याच्या मित्रांसोबत त्या तरुणाच्या घरी पोहोचला आणि घराचा दरवाजा ठोठावू लागला. त्या तरुणाच्या वडिलांनी दरवाजा उघडले. त्यानंतर संबंधित आरोपी त्याच्या वडिलांना विचारतो, 'बळीराम कुठे आहे?'. त्या तरुणाच्या वडिलांनी उत्तर दिले की त्यांचा मुलगा घरी नाही. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण:
याच दरम्यान, आरोपीच्या हातात मोठा कोयता असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुण्यासह राज्यभरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल:
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, बळीराम सुतार यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणात, अथर्व कुरले, प्रेम चिंचार, आणि स्वराज साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
रहिवाश्यांची प्रतिक्रिया:
'जर गुन्हेगार घरापर्यंत पोहोचू लागले, तर शहरामध्ये कायदा-सुव्यवस्था आहे का?' असा सवाल रहिवाश्यांनी उपस्थित केला. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू केले.