बीड : बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. याआधी श्वविच्छेदनाच्या अहवालातून हे समोर आले होते. मात्र सीआयडीने नुकतच या प्रकरणासंबंधीचे दोषारोपपत्र सादर केले. यात देशमुखांची अमानुषणे हत्या केल्याचे पुरावे सादर करण्यात आले. आता सीआयडीच्या चार्जशीटमधून देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना मारल्याचे समोर आले आहे. त्यांना हालहाल करून मारतानाचा आणखी मोठा पुरावा समोर आला आहे.
संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना हाल करून मारण्यात आले. यावेळी देशमुखांना मारण्यासाठी पीयूसी पाईपचा वापर करण्यात आला. पाईपचे 15 तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारण्यात आले. देशमुखांना मरणयातना देण्यात आल्या. मारल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. मारहाणीनंतर आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासमवेत फोटो काढला आहे. यामध्ये देशमुखांना यातना होताना झालेला आनंद दिसून येत आहे. जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या फोटोंमध्ये दिसून येत आहेत.
हेही वाचा : Pankaja Munde Statement: मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंनी केले भाष्य
मस्साजोगचे सरपंच देशमुख यांना पाईपने मारहाण करण्यात आली. प्रतीक आणि सुदर्शन घुलेने देशमुखांना अर्धमेल होईपर्यंत मारहाण केली. मारहाण इतकी भीषण होती की पाईपचे एक नाही दोन नाही तर तब्बल 15 तुकडे झाले. देशमुखांना मारताना क्रूरतेची परिसीमा ओलांडली. सीआयडीने केलेल्या तपासात घटनास्थळावरून पाईपचे 15 तुकडे गोळा करण्यात आले आहेत आणि चार्जशीटमध्ये पुरावा म्हणून ते जोडण्यात आले आहेत.
संतोष देशमुखांना केलेल्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. यामुळे बीड बंदची हाक देण्यात आली आहे. आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाजमाध्यमांमधून त्यांच्यावर राग व्यक्त होत आहे. पोलिसांनी शांततेचे आव्हान केले आहे. तरी लोकांमध्ये चीड आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त केला आहे.