Fire At Factory In Uran: पुण्यातील आगीची बातमी ताजी असतानाचं नवी मुंबईमधून आगीची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील उरण येथील एका मोठ्या खाजगी कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर मोठ्या शर्थीने नियंत्रण मिळवलं. आग लागली तेव्हा कारखाना संपूर्ण जळून खाक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, नौदलाच्या त्वरित आणि समन्वित प्रतिसादामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
हेही वाचा - Bus Catches Fire in Hinjawadi IT Park: हिंजवडीमध्ये खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला आग, 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पश्चिम नौदल कमांडच्या अधिकृत पेजवरील एका X पोस्टमध्ये, भारतीय नौदलाने उरण येथील कारखान्यात लागलेल्या भीषण आगीची माहिती दिली असून आगीचे काही व्हिडिओज आणि फोटोज शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, '#IndianNavy, नागरी संस्थांशी समन्वय साधून, मुंबईतील उरण येथील एका मोठ्या खाजगी कारखान्यात लागलेल्या मोठ्या आगीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत, नौदल स्टेशन कारंजाने अग्निशमन प्रयत्नांना चालना देण्यासाठी अग्निशमन दलांना त्वरित घटनास्थळी पाठवले. जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक देखील तैनात करण्यात आले.'
पहा व्हिडिओ -
हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar: 'धरण उशाला आणि कोरड घशाला'; संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाई
स्थानिक अधिकाऱ्यांकडून आपत्तीचा फोन येताच, नौदल स्टेशन कारंजाने तातडीने त्यांचे अग्निशमन दल आणि विशेष अग्निशमन पथके घटनास्थळी पाठवली. नौदल कर्मचाऱ्यांनी नागरी संस्थांसोबत मिळून आगीशी लढण्यासाठी एकत्र काम केले. अग्निशमन प्रयत्नांव्यतिरिक्त, आगीत जखमी झालेल्यांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी नौदलाने एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक देखील तैनात केले. या व्यापक प्रतिसादातून मानवी जीवनाचे रक्षण आणि आपत्तींचे परिणाम कमी करण्यासाठी नौदलाच्या समर्पण अधोरेखित झाले.