Sunday, August 17, 2025 05:13:27 PM

गुंडांसोबत केक कापून पोलिसाचा वाढदिवस,कायद्याच्या रक्षकांनीच नियम मोडले!

पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी गेन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या व्यक्तींसोबत भररस्त्यात वाढदिवस साजरा करत नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुंडांसोबत केक कापून पोलिसाचा वाढदिवसकायद्याच्या रक्षकांनीच नियम मोडले

पिंपरी-चिंचवड: पोलिसांना कायद्याचे रक्षक मानले जाते, परंतु जेव्हा हेच रक्षक कायद्याची चौकट ओलांडतात, तेव्हा समाजात वाद निर्माण होतो. असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी गेन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या व्यक्तींसोबत भररस्त्यात वाढदिवस साजरा करत नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पोलिस स्टेशनमधील काही कर्मचारी आणि स्थानिक मंडळींच्या उपस्थितीत प्रवीण पाटील यांचा वाढदिवस मध्यरात्री मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. दोन मजली केक कापला गेला, हवेत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, फायर गनने हवेत गोळ्या झाडण्यात आल्या आणि संपूर्ण कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रीत करण्यात आला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

हेही वाचा: महिला दिनी न्यायासाठी लढा! झारगडवाडीतील महिलांचे बारामतीत उपोषण

या व्हिडीओंमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक सहभागी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेव्हा पोलिसच अशा लोकांसोबत आनंदोत्सव साजरा करतात, तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचे काय? सामान्य नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?

या प्रकरणी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर पोलिस दलातीलच काहीजण कायद्याची पायमल्ली करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.हा प्रकार पोलिस दलाच्या शिस्तीवर आणि कायदा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आता प्रशासन यातून कोणता धडा घेते आणि पुढील कारवाई काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री