महाराष्ट्र: भल्या भल्यांना मातीत लोळवणारी कुस्ती महारष्ट्रात लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कुस्तीचा वाद चांगलाच पेटला होता. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीच्या सामन्यादरम्यान हा वाद झाला होता. त्यामुळे या सामन्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याचं देखील पाहायला मिळालं. पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी 5 जणांची चौकशी समिती गठीत करण्यात देखील करण्यात आली. पंचांनी दिलेल्या निर्णयावर वाद झाल्यामुळे विलास कथुरे यांच्या अध्यक्षेतखाली ही नेमली समिती नेमण्यात आली. त्यातच आता महाराष्ट्र केसरी पैलवान पीएसआय व्हायला हवा असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा: तुळजापूर ड्रग्ज रॅकेटचं मुंबई कनेक्शन?
काय म्हणाले रोहित पाटील?
महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानची पीएसआय पदी नेमणूक करण्याची घोषणा आपले वडील आर आर पाटील यांनी केली होती.मात्र ती कालांतराने बंद झाली,मात्र आता या मागणीसाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन महाराष्ट्र केसरी पैलवानला पीएसआय म्हणून नियुक्ती झाली पाहिजे,यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊ,असे देखील रोहित आर आर पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान महाराष्ट्र केसरी पैलवान पीएसआय व्हायला हवा, मुख्यमंत्र्यांना भेटून त्यासंदर्भात विनंती करणार असल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलं असून त्यांनी आपल्या वडिलांची भूमिका मांडलीय. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानची पीएसआय पदी नेमणूक करण्याची घोषणा आपले वडील आर आर पाटील यांनी केली होती.मात्र ती कालांतराने बंद झाली,मात्र आता या मागणीसाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन महाराष्ट्र केसरी पैलवानला पीएसआय म्हणून नियुक्ती झाली पाहिजे,यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊ असं रोहित आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय.