Wednesday, July 16, 2025 09:00:44 PM

माउलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण

लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे.

माउलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण

लोणंद - लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे. या ठिकाणाहून दोन दिवसांचा मुक्काम आटपून माउलींची पालखी तरडगावच्या दिशेने मार्ग झाली आहे. येथे पालखीचे पहिले रिंगण पार पडले. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी उपस्थित होते. या रिंगणात प्रथम झेंडेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आणि विणेकरी, त्यानंतर मानाच्या पालख्यांच्या समवेत अश्व आखलेल्या रिंगणाच्या ३ फेर्‍या पूर्ण करतो. अश्वांचे पूजन झाल्यानंतर रिंगणास प्रारंभ होतो. रिंगणातील अश्वाच्या पायाखालील माती भाळी लावणे, हे वारकरी आपले भाग्य समजतात. काही वेळानंतर पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्कामासाठी जाणार आहे त्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.


सम्बन्धित सामग्री