Saturday, August 16, 2025 08:41:45 PM

रात्री थंडी आणि दिवसभर उकाड्याने मुंबईकर हैराण

मुंबईकर सध्या हवामानातील प्रचंड बदलामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री अचानक गारवा जाणवतो, तर दिवसभर उकाडा होत आहे.

रात्री थंडी आणि दिवसभर उकाड्याने मुंबईकर हैराण

मुंबई: मुंबईकर सध्या हवामानातील प्रचंड बदलामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री अचानक गारवा जाणवतो, तर दिवसभर उकाडा होत आहे. अशा अनपेक्षित बदलांमुळे नागरिकांचे हाल होत असून, आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुंबईसारख्या शहरात सामान्यतः उष्ण व दमट हवामान असते. मात्र अलीकडेच तापमानात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. रात्री तापमान खाली जात आहे, त्यामुळे थोडासा गारठा जाणवतो. पण सकाळ होताच उन्हाचा तडाखा सुरू होतो. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मुंबईकरांचा त्रास वाढला
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक मुंबईकर हैराण झाले आहेत. सकाळी थोडासा गारवा असल्याने लोक उबदार कपडे घालून बाहेर पडतात, पण दुपार होताच उन्हाच्या झळा त्रासदायक ठरतात. लोकांना यामुळे कोणते कपडे घालावेत, हेच समजेनासे झाले आहे.

आरोग्यावर परिणाम
तापमानातील या प्रचंड फरकामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हा बदल जास्त त्रासदायक ठरत आहे.

हवामान बदलामागचे कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या हवामान बदलाचे परिणाम संपूर्ण देशभर दिसून येत आहेत. समुद्राच्या जवळ असल्यामुळे मुंबईतील आर्द्रता अधिक आहे. थंड वारे आणि उष्ण हवामान यांच्यातील तफावत यामुळे निर्माण होत आहे. हवामान बदलाच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री