Tuesday, March 18, 2025 09:52:01 PM

अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर दाखल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळात खरी माहिती लपवल्याची तक्रार केली होती. आता या तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर दाखल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Dhananjay Munde Meets Ajit Pawar
Edited Image

Dhananjay Munde Meets Ajit Pawar: महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेले आहेत. धनंजय मुंडे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळात खरी माहिती लपवल्याची तक्रार केली होती. आता या तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. 

गेल्या दीड महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यात आता करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - परवानगी घेतल्याशिवाय स्नेहभोजनाला जाऊ नका; आदित्य ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना सूचना

 सुरेश धस यांच्या आरोपांनंतर सतत चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे काल कॅबिनेटला देखील अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असल्याचं कारण देण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीतील अनेक कामांच्या बाबतीत चौकशी लावण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांना पुराव्यासह पत्र दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी समितीत देखील गठीत केली होती. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींना वेग येत असताना धनंजय मुंडे अजित दादा पवार यांच्या भेटीला जातात. यावेळी मात्र अचानकच भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

हेही वाचा - आदित्य ठाकरेंनी दिल्लीत पवारांना भेटणं टाळलं; पवारांवर ठाकरे गटाची नाराजी

काय आहे करुणा मुंडे यांची तक्रार? 

करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असून गेल्या काही वर्षांपासून त्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. 
त्यांनी निवडणुकीच्या काळात देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात अर्ज भरला होता. परंतु त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाने बात केला. तेव्हापासूनच करुणा मुंडे धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप करत आहेत. यावेळी करुणा मुंडे-शर्मा यांनी निवडणूक अर्जामध्ये धनंजय मुंडे यांनी खरी माहिती दिली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच आता यावरून धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री