बीड : बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. एकेक प्रकरण बाहेर येताना पाहायला मिळत आहे. आता भोसले आणि आमदार धस यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
भाजप आमदार सुरेश धस आणि सतीश उर्फ खोक्याचे जवळचे संबंध आहेत. सुरेश धस यांच्या आशीर्वादाने हरण, काळवीट आणि मोराची तस्करी सुरू होती. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी केली जावी अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
दरम्यान सुरेश धस यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. तसेच सुरेश धस आणि खोक्या भोसले याची नार्को टेस्ट करावी जेणेकरून यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असेही वाघमारे यांनी म्हटले आहे. पुढे मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरेश धस यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुरेश धस यांचे कारणामे खोक्याने बाहेर काढू नये. यासाठी त्यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. मात्र धसांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्यावा अशी मागणी नवनाथ वाघमारे करत आहेत.
हेही वाचा : Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
भोसले कोण आहे?
सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी खोक्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत होते. सुरूवातीला पैसे उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर एका गरीब व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे पोलिस खोक्याच्या शोधात होते. तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. नंतर खोक्याला उत्तरप्रदेशातील प्रयागराजमधून अटक करण्यात आली.
सतीश भोसले हा आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप सातत्याने होत होता. मात्र धसांनी भोसलेसोबत अलीकडे ओळख झाल्याचा सांगितले होते. तसेच सतीश भोसले याला अटक झाल्यानंतरही भाजपा आमदार धस यांची प्रतिक्रिय समोर आली होती. खोक्याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यानं जी चूक केली त्यानुसार त्याला अटक केलेली आहे. कायद्यानुसार कारवाई करावी, असंही आमदार सुरेश धस म्हणाले होते.