Wednesday, June 18, 2025 03:09:52 PM

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा; रामदास आठवलेंचे वक्तव्य

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत म्हणाले की, 'पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात यायलाच हवा'.

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा रामदास आठवलेंचे वक्तव्य

जालना: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत म्हणाले की, 'पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात यायलाच हवा. गरज भासली, तर पाकिस्तानलाच ताब्यात घेण्याची वेळ येऊ शकते', असं ठामपणे त्यांनी विधान केले. 'डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आदर आहे, पण कोणाच्याही मध्यस्थीची भारताला गरज नाही. आम्ही पाकिस्तानसोबत थेट चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, त्याआधी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावे', असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा: खानमंडळींना लाज वाटत नाही? शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचे वक्तव्य

पुढे त्यांनी असेही नमूद केले की, 'युद्धविरामाची विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. म्हणजे त्यांनी हार मान्य केली आहे'. यादरम्यान, आंतरजातीय विवाह सहाय्य योजना बंद केली जाणार नाही, याचे स्पष्टीकरण देत रामदास आठवले म्हणाले की, 'दरवर्षी 2.5 लाख आंतरजातीय विवाह होतात. यामुळे समाज एकत्र येत आहे'.

हेही वाचा: 68 वर्षीय आज्जीने उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा

समाजकल्याण विभागाच्या निधीबाबत संजय शिरसाट यांच्या विधानावरही आठवले यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, 'गोरगरिबांच्या हितासाठी असलेला निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवणं चुकीचं आहे. अन्य खात्यांचा निधी वळवावा, समाजकल्याण खात्याचा नाही. कर्नाटकात असे कायदे आहेत की अशा निधीचा वापर अन्यत्र करता येत नाही', असे देखील आठवले म्हणाले.


सम्बन्धित सामग्री