मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी भाजपाकडून विशेष रेल्वे सोडण्यात आली. भाजपा आमदार नितेश राणे यांनी या विशेष रेल्वेला दादर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर गणेशभक्तांसाठी सातशेहून अधिक बस सोडण्यात आल्या. भाजपाकडून कोकणात जाण्यासाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात आल्या.