Sunday, August 17, 2025 08:09:43 AM

सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही; 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज यांच्याशी भुसे यांनी चर्चा केली.

सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार

मुंबई: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज यांच्याशी भुसे यांनी चर्चा केली. यावेळी सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही असे मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितले आहे. 

नुकतच राज ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झाली. या भेटीत दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा केली. यावर सरकारची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार आहे असेही त्यांनी म्हटले. हा मोर्चा केवळ मराठी माणसांसाठी असणार आहे. मोर्चात कोण येणार आणि कोण नाही? हे बघायचंय. ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतही चर्चा करणार असल्याचे राज यांनी सांगितले. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र, मराठी भाषा महत्त्वाची आहे. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं भुसेंकडे नव्हती असेही राज म्हटले. 

हेही वाचा : 'सरकारची भूमिका सध्या तरी राज ठाकरेंना मान्य नाही'

दादा भुसे यांनी आज माझी भेट घेतली. त्यांनी भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. भूमिका फेटाळून लावली आणि मान्य नाही असे सांगितले. 5 वी पासून तिसऱ्या भाषेचा विषय येतो. त्यांनी ही मान्य केले की राष्ट्रीय शिक्षण धोरणारवर कोणताही आग्रह नाही. राज्यांवर टाकलेले हा बोजा आहे. ते अनाकलनीय असल्याचे राज यांनी म्हटले. CBSC आणि इतर शाळा IS लोकांसाठी आहे. कारण त्यांच्या मुलांना सगळीकडे फिरावे लागते. महाराष्ट्र का आग्रही आहे हे विचारले. भुसेंकडे याचे उत्तर नाही. आमच्याकडे हिंदी आणि इतर भाषेची सक्ती करू देणार नाही. तसेच सर्व पक्षांना आवाहन करत आहे की 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कोणताही झेंडा नाही. मराठी माणसाचा हा मोर्चा आहे. नेतृत्व पण मराठी माणूस करेल. सर्व पालकांना विद्यार्थ्यांना कळू दे की महाराष्ट्राच्या मनात काय आहे? मी इतर राजकीय पक्षांना आवाहन करेन. मराठी विरुद्ध हा कट आहे ज्या विरोधात सर्वांनी एकत्र यावे. कोणताही झेंडा नसेल पण मराठी हा अजेंडा आहे. सर्व विरोध दर्शवत आहे. कोण कोण त्या मोर्चात सामील होत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी लढाई आहे. 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे हेही आहेत. त्यांना पण बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.


सम्बन्धित सामग्री